🔶कोल्हापूर चे बाळु घाडगे हे उत्तम प्रतिचे सत्यशोधक जलसाकार होते..
पंढरपूर चे भीमराव नानाजी खरात हे सहकारी होते.
🔶 ११ सप्टेंबर १९३४ ला रघुनाथराव बखले यांनी अस्पृश्यता निवारण बिल मांडले; ज्याला त्यांचेच सहकारी ब्राम्हणेतर पक्षाणे विरोध केला.
🔶ॲंड. दौंड (मुंबई) व ॲंड सावंत (नाशिक)यांनी ब्राम्हणेतर पक्षातुन मुंबई ईलाखा शेतकरी पक्ष स्थापला.
🔶कुपर व नवले यांनी नागरिक शेतकरी पक्ष स्थापन केला.
🟣 पहिले दलित क्रांतीकारक,पहिले विचारवंत, पहिले पत्रकार, दलित चळवळीचे जन्मदाते गोपाल बाबा वलंगकर. दापोली चे.
ते म. फुले यांच्या सोबत राहिले व प्रभावित झाले. दिनबंधु व सुधारक वृत्तपत्रामधुन लिखाण केले .( दि. मोरे सर बुक पेज ३६४)
🔶लाॅर्ड किचनेर यांनी भारतीय लष्करात अस्पृश्य भरती बंद केलती. या विरोधात वलंगकर यांनी रानडे यांच्या सहकार्याने अर्ज लिहला भरती चालू करण्यात यावी.
🔶अनार्य दोष परिहारक मंडळी १८९३ दापोली त स्थापण गोपाळ बाबा वलंगकर.
त्यांनी काँग्रेसला ५ वे अधिवेशनात ( मुंबई) विनंती केली की अस्पृश्यतेचा प्रश्न काँग्रेसचे कार्यक्रम पत्रिकेत घ्यावं पन ति मान्य झाली नाही.
🔶 भारतातील पहिली अस्पृश्य परिषद बोलवण्याचा मान शिवराम जानबा कांबळे यांना जातो.
१९०३ सासवड परिषद ५१ गावांतील महार सभा.
🔶जेजूरी क्षेत्रातील परिषद ५ एप्रिल १९१० सुभेदार बहादर गंगाराम कृष्णाजी भातनकर, पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली जेजुरी ला सभा भरली. यात मुंबई सरकारला एक अर्ज लिहला त्यावर याला गोखले ,केशवचंद्र सेन यांनी अभिप्राय दिले.
🔶 नागपूर ला १९२० ला अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषद भरली यात कांबळे यांनी मुलभूत विचार मांडले. यात बाबासाहेब हजर होते.
आर्यांचा भारतावरील आक्रमक सिद्धांत त्यांना मान्य नव्हता. महारांचा स्वाभिमानी इतिहास त्यांनी सांगितल.
🟣 विदर्भातील अस्पृश्य त्रिमूर्ती किसन फागुजी बनसोडे, गणेश गवई, कालीचरण नंदागवळी.
✅१९०१ ला किसन फागुजी बनसोडे (शिक्षक)
यांनी सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज ही संस्था नागपुरात स्थापण केली.
त्यांनी चार वर्तमानपत्र काधली:-
☑️निराश्रीत हिंद नागरीक (१९१०),
☑️विटाळ विध्वंस (१९१३).
☑️मजुर पत्रिका (१९१८)
☑️चोखामेळा (१९१९).
🔹विटाळ विध्वंस हा ग्रंथ मात्र गोपाळ बाबा वलंगकर यांनी लिहला
🔹चोखामेळा वसतिगृह काधुन नागपूर, अमरावती, अचलपूर, चिखली, यवतमाळ येथे शाखा.
१९४२ ला संत चोखामेळा चरित्र लिहले.
🔹चोखामेळा देवदर्शन व सत्यशोधक जलसा ही दोन नाटकं पण बनसोडे यांनी लिहिली.
🔹 त्यानी ज्ञानप्रकाश, सकाळ, सुबोध पत्रिका, काळ, केसरी, राष्ट्रवीर, महाराष्ट्र, मुमुक्षू, मुंबई वैभव या वृत्तपत्रात स्फुट लेखन केले.
🔶 हरिजन शब्दाला त्यांनी विरोध केला.
🔶मे-जुन १९२० नागपूर परिषद बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते .
अध्यक्ष:- राजर्षी शाहू महाराज.
स्वागताध्यक्ष:- कालीचरण नंदागवळी.
सेक्रेटरी:- गणेश गवई व फागुजी बनसोडे.
🟣 गणेश अक्काजी गवई अमरावती भुगाव गावचे.
यांचे अध्यक्षतेखाली १९११ ला अधिवेशन भरले अडीच हजार महार एकत्र आले.
यात विरा शिंदे, जनाबाई शिंदे, इंदिराबाई पुरचुरे, पा स केळकर, गोविंदराव काणे, नि स भागले, न भ द्रविड, लक्ष्मणराव कैकणी, महत्वपूर्ण पाहुणे होते.
🟣 २० जुलै १९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा. स्थापन.
अध्यक्ष:- सर चिमनलाल सेटलवाड.
उपाध्यक्ष:- जी के नरिमन, र पु परांजपे, बाळ गंगाधर खेर.
कार्याध्यक्ष:- बाबासाहेब आंबेडकर.
सेक्रेटरी:- शिवतरकर.
🔶 अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती माधोराव मेश्राम यांनी सुरु केला होता.
🟣 डॉ बाबासाहेब आंबेडकर घडामोडी कालानुरूप:-
☑️मुकनायक पाक्षीक ३१ जानेवारी १९२०.
☑️ मानगाव परिषद २० मार्च १९२०
☑️ नागपूर परिषद ३० मे १९२०.
☑️ बॅरिस्टर १९२३.
☑️ बहिष्कृत हितकारिणी सभा २० जुलै १९२४.
☑️महाड सत्याग्रह २० मार्च १९२७
☑️ बहिष्कृत भारत ३ एप्रिल १९२७.(१९२९ला बंद ३४ अंक निघाले.)
☑️
☑️ मनुस्मृती दहन २५ डिसेंबर १९२७
☑️समता वृत्तपत्र २९ जुन १९२८.( समाज समता संघाचे मुखपत्र) देवराव नाईक संपादक.
☑️जनता वृत्तपत्र २४ नोव्हेंबर १९३० पाक्षीक नंतर साप्ताहिक.(१९५६ पर्यंत चालु होते) गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल हे ब्रीदवाक्य वृत्तपत्राचे.
☑️लंडन पहिली गोलमेज १९३०
☑️दुसरी गोलमेज १९३१
☑️काळाराम मंदिर सत्याग्रह १९३१-१९३४
☑️रॅम्से मॅकडोनाल्ड जातिय निवाडा १६ ऑगस्ट १९३२.
☑️ पुणे करार २४ सप्टेंबर १९३२
☑️येवला परिषद १९३५ धर्मांतर घोषणा.
☑️ स्वतंत्र मजुर पक्ष १९३७
☑️ शेड्युल कास्ट फेडरेशन जुलै १९४२
☑️ पीपल्स एज्युकेशन सोसायटी १९४५.
☑️ प्रबुद्ध भारत १९५६
☑️धर्मांतर १४ऑक्टोबर १९५६.
🔶3 ऑक्टोबर १९५७ ला स्थापित रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष मद्रास प्रांतातील आमदार एन शिवराज हे होते.

Leave a Reply