भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटना व तारखा

मुक्ती दिवस (मुस्लिम लीग)22 डिसेंबर 1939
मुक्ती दिवस (Day of Deliverance) मुस्लिम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळांच्या राजीनाम्यानंतर साजरा केला.

पाकिस्तानची मागणी (लाहोर ठराव)24 मार्च 1940
मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची औपचारिक मागणी मांडली.

ऑगस्ट घोषणा8 ऑगस्ट 1940
ब्रिटिश सरकारने भारतीयांना काही घटनात्मक सवलतींचे आश्वासन दिले.

क्रिप्स मिशनचे आगमन22 मार्च 1942
युद्धानंतर भारताला अधिराज्य दर्जा देण्याचा प्रस्ताव घेऊन क्रिप्स भारतात आले.

भारत छोडो प्रस्ताव8 ऑगस्ट 1942
मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात “करेंगे या मरेंगे” घोषणेसह प्रस्ताव मंजूर.

शिमला परिषद / शिमला संमेलन25 जून 1945
भारताच्या राजकीय प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिषद आयोजित.

नौदल उठाव18 फेब्रुवारी 1946
मुंबईपासून सुरू झालेल्या उठावाने ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का दिला.

कॅबिनेट मिशनचे आगमन24 मार्च 1946
भारताच्या सत्तांतरासाठी घटनात्मक आराखडा तयार करण्यासाठी मिशन आले.

प्रत्यक्ष कार्यवाही दिवस16 ऑगस्ट 1946
मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानसाठी आंदोलन पुकारले.

अंतरिम सरकारची स्थापना2 सप्टेंबर 1946
स्वतंत्रतेपूर्वी भारतात तात्पुरते सरकार स्थापन झाले.

पंतप्रधान ऍटली यांची घोषणा20 फेब्रुवारी 1947
30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश भारत सोडतील अशी घोषणा.

माउंटबॅटन योजना3 जून 1947
भारत विभाजन आणि सत्तांतराचा आराखडा जाहीर.

भारतीय स्वातंत्र्य कायदा18 जुलै 1947
ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्यास मान्यता देणारा कायदा मंजूर.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading