🔶गांधी युगाचा उदय :
गांधीजींनी सत्याग्रहाचा उपयोग प्रथम आफ्रिकेत ब्रिटिशांविरुद्ध केला.
सन 1912 मध्ये गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली, त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या सत्याग्रह पद्धतीचा अनुभव घेतला.
ब्रिटिश शासन गांधीजींच्या सत्याग्रहापुढे अयशस्वी झाले. गोखल्यांनी गांधीजींना भारतात येण्याची विनंती केली आणि गांधीजी भारतात परतले.
गांधीजी जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून भारतात परतले, जे त्यांना गुरु मानत होते.
- भारतातील चळवळी :
भारतात आल्यावर गांधीजींनी काही चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (1917) –
बिहारमध्ये निळीच्या मळ्यात काम करणाऱ्या गरीब शेतकर्यांना यूरोपियन मळेवाल्यांच्या अन्यायातून वाचवण्यासाठी गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.
साराबंधी चळवळ (1918) –
गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली होती. ब्रिटिश अधिकारी शेतकऱ्यांकडून अनावश्यक वसुली करीत होते. गांधीजींनी याविरुद्ध साराबंदी चळवळ सुरू केली. शासनाने दुष्काळग्रस्त भागात महसूल वसुली थांबवण्याचा निर्णय घेतला, जो गांधीजींच्या दुसऱ्या विजयासमान होता.
रौलॅक्ट अॅक्ट (1919) –
भूतपूर्व कायद्यात अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास झाला, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती विना चौकशी अटक केली जाऊ शकली. या कायद्याच्या निषेधार्थ 6 एप्रिल 1919 रोजी भारतभर बंद पाळला गेला, जो काँग्रेसच्या इतिहासातील पहिला अखिल भारतीय बंद होता.
13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत या कायद्याच्या निषेधार्थ सभा झाली, जिथे जनरल डायरने लोकांवर गोळीबार केला.
- असहकार आंदोलन :
डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार चळवळीचा कार्यक्रम सुरू झाला.
पुढील दोन वर्षे गांधीजींनी अहिंसक असहकार आंदोलन चालवले.
फेब्रुवारी 1922 मध्ये चौरीचौरा येथे जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली, ज्यात 21 जण मारले गेले. या घटनेमुळे गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
- स्वराज्य पक्षाची स्थापना :
सन 1923 मध्ये निवडणुका होणार होत्या. असहकार चळवळीच्या संदर्भात चित्तरंजनदास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
गांधीजींनी या पक्षाला मान्यता दिली आणि त्यांना विधीमंडळाच्या निवडणूकांमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली.
- सायमन कमिशन (1928) :
भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतात राजकीय सुधारणांच्या अहवालासाठी सायमन कमिशन नेमले, ज्यामध्ये सर्व सदस्य इंग्रज होते. त्यामुळे काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.
- नेहरू रिपोर्ट (1928) :
लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना एकत्रित होऊन राज्यघटना तयार करण्याचे आवाहन केले. काँग्रेसने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटनेचा मसुदा तयार केला, जो भारताच्या इतिहासात नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे.

Leave a Reply