राज्य पुनर्रचना संदर्भातील आयोग व समित्या

1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)
➤ स्थापना: 1948
➤ अहवाल: 1948
➤ अध्यक्ष: एस. के. धार
➤ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष
➤ शिफारस:
 ▪️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा
 ▪️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली, मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत

2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)
➤ स्थापना: 1948
➤ अहवाल: 1949
➤ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या
➤ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष
➤ शिफारस:
 ▪️ भाषिक तत्त्वास विरोध
 ▪️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही

3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)
➤ स्थापना: 1953
➤ अहवाल: 1955
➤ अध्यक्ष व सदस्य:
 ▪️ फाजल अली (अध्यक्ष)
 ▪️ के. एम. पण्णीकर
 ▪️ हृदयनाथ कुंझरू
➤ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार
➤ शिफारस:
 ▪️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन
 ▪️ ‘एक राज्य – एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार
 ▪️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading