🏛 घटनात्मक संकल्पना व तत्वांशी संबंधित बाबी
➤ संघराज्य या शब्दाचा थेट उल्लेख नाही
➤ धर्मनिरपेक्ष (Secular) शब्दाचा उल्लेख केवळ प्रस्तावना (Preamble) मध्ये आहे; मुख्य घटनेत इतरत्र नाही
➤ समाजवादी (Socialist) शब्दही फक्त प्रस्तावनेत आहे
➤ समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्टपणे मांडलेला नाही
➤ संसदीय शासनतत्त्व याचे स्पष्ट वर्णन दिलेले नाही
➤ कॅबिनेट या शब्दाचा मूळ घटनेत उल्लेख नाही
➤ कॅबिनेट समित्या यांचा उल्लेख नाही
➤ मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही
➤ घटनाभंग (Breakdown of Constitution) या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही
➤ राष्ट्रपती राजवट असा शब्दप्रयोग नाही; त्याऐवजी Failure of Constitutional Machinery असा शब्दप्रयोग आहे
➤ न्यायालयीन पुनर्विलोकन (Judicial Review) या संज्ञेचा थेट उल्लेख नाही
➤ न्यायालयीन अवमान (Contempt of Court) ची व्याख्या दिलेली नाही
🧑⚖️ न्यायव्यवस्था, CAG व न्यायाधीशांशी संबंधित बाबी
➤ CAG (महालेखापरीक्षक) चा कार्यकाळ घटनेत निश्चित केलेला नाही
➤ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही
➤ उच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या याचा उल्लेख नाही
➤ उच्च न्यायालय न्यायाधीश होण्यासाठी किमान वय निश्चित केलेले नाही
➤ न्यायाधीशांचा पदावधी ठरवलेला नाही
👥 कार्यकारी व विधिमंडळाशी संबंधित बाबी
➤ पंतप्रधान पदाचा कालावधी निश्चित केलेला नाही
➤ मंत्रिमंडळ रचना यासंबंधी स्पष्ट तरतूद नाही
➤ राष्ट्रपतीने विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही
➤ उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे नमूद नाहीत
➤ मुख्यमंत्री निवड व नियुक्तीची पद्धत स्पष्ट नाही
➤ महाधिवक्ता (Advocate General) चा कार्यकाळ आणि पदावरून काढण्याची प्रक्रिया स्पष्ट नाही
➤ महान्यायवादी (Attorney General) चा कार्यकाळ व पदावरून काढण्याची तरतूद नाही
➤ व्हीप्स (Whips/प्रतोद) चा उल्लेख नाही
➤ संसद सदस्यांच्या पेन्शनबाबत कोणतीही तरतूद नाही
➤ लोकसभा अध्यक्षपदासाठी पात्रता ठरवलेली नाही
🧑🤝🧑 नागरिक व अल्पसंख्यांशी संबंधित बाबी
➤ नागरिकत्व संपादन व समाप्ती बाबत स्थायी तरतुदी नाहीत
➤ अस्पृश्यता (Untouchability) या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही
➤ अल्पसंख्याक (Minority) या शब्दाचा अर्थ स्पष्ट नाही.

Leave a Reply