जागतिक ओझोन दिवस 2025

1.दिनांक व पार्श्वभूमी
➤ संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी “ओझोन थर संवर्धन दिन” साजरा करतो.
➤ पहिला जागतिक ओझोन दिवस : 1995
➤ या दिनाचे महत्त्व : 1987 मध्ये झालेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल स्वाक्षरीच्या स्मरणार्थ.

2.मॉन्ट्रियल प्रोटोकॉल (1987)
➤ उद्देश : ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांवर (ODS – Ozone Depleting Substances) नियंत्रण.
➤ सर्व देशांचा सहभाग असलेला यशस्वी आंतरराष्ट्रीय करार.
➤ हायड्रो-क्लोरो-फ्लुरो-कार्बन (HCFCs) आणि क्लोरो-फ्लुरो-कार्बन (CFCs) यांच्या वापरावर टप्प्याटप्प्याने बंदी.
➤ ओझोन थर पुनर्संचयित होण्यात प्रोटोकॉलची मोठी भूमिका.

3.भारतामधील उपक्रम
➤ पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय अंतर्गत ओझोन सेल या कार्यक्रमाचे आयोजन करते.
➤ शालेय-विद्यार्थी जागरूकता कार्यक्रम, परिसंवाद, वादविवाद, निबंध स्पर्धा यांचे आयोजन.
➤ ODS वापरावर नियंत्रणासाठी भारताची नॅशनल अॅक्शन प्लॅन.
➤ ऊर्जा कार्यक्षम शीतकरण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन.

4.2025 ची थीम
➤ “विज्ञानापासून जागतिक कृतीपर्यंत” (From Science to Global Action)
➤ उद्दिष्ट : वैज्ञानिक संशोधनावर आधारित धोरणे व प्रत्यक्ष कृतींमुळे ओझोन व हवामान दोन्हीचे रक्षण.

5.2024 ची थीम
➤ “मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: हवामान कृतींमध्ये प्रगती” (Montreal Protocol: Advancing Climate Actions)

6.ओझोन थराचे महत्त्व
➤ पृथ्वीवरील सजीवांना हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासून संरक्षण.
➤ त्वचारोग, डोळ्यांचे आजार, शेती व सागरी परिसंस्थांचे नुकसान टाळते.

7.सध्याची स्थिती व आव्हाने
➤ मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे ओझोन छिद्र कमी होत आहे.
➤ 2040-2060 दरम्यान ओझोन थर पूर्ववत होईल अशी अपेक्षा.
➤ मात्र, हवामान बदल आणि हायड्रोफ्लुरोकार्बन (HFCs) सारखे पर्याय हे नवीन आव्हान.

8.आगेचा मार्ग
➤ शीतकरण तंत्रज्ञानात शाश्वत उपायांचा अवलंब.
➤ आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि हरित तंत्रज्ञानाचा प्रसार.
➤ जनजागृतीद्वारे शाश्वत जीवनशैलीचा प्रसार.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading