मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

    ✓3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एकूण पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. 

    ✓पाच भाषा पुढीलप्रमाणे - मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. 

    ✓अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे. 

    ✓आतापर्यंत भारतातील अकरा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला.

▪️अभिजात दर्जा प्राप्त भाषा : एकूण अकरा –

1) तमिळ – 2004
2) संस्कृत – 2005
3) कन्नड – 2008
4) तेलगू – 2008
5) मल्याळम – 2013
6) ओडिया – 2014
7) मराठी – 2024
8) पाली – 2024
9) बंगाली – 2024
10) आसामी – 2024
11) प्राकृत – 2024

▪️निकष – केंद्र सरकारने अभिजात भाषेचे एकूण चार निकष ठरविले आहे:

✓1) भाषेची प्राचीनता – संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्ष प्राचीन असावा.

✓2) भाषेची मौलिकता आणि सलगता – या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे, मौल्यवान असावे.

✓ 3) स्वयंभू – भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.

✓4) भिन्नता – प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.

▪️अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे फायदे:

✓ अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

✓ अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.

✓ प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

✓ प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात.
आर्थिक अनुदान मिळते.

✓ आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होते.

✓ भारतातील सर्व 450 विद्यापीठामध्ये संबंधित भाषा शिकविण्याची सोय केली जाते.

▪️मराठी भाषा

✓ ही भारताच्या 22 अधिकृत भाषेपैकी एक आहे.

✓ मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.

✓ भारतात मराठी भाषकाची एकूण लोकसंख्या सुमारे 14 कोटी आहे.

✓ मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.

✓ प्राचीन महारट्ठी, मरहट्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे.

▪️रंगनाथ पठारे समिती:

✓ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती 10 जानेवारी 2012 ला नेमण्यात आली.

✓ या समितीने 31 मे 2013 ला आपला अहवाल सादर केला.

✓ या समितीतील सदस्य हरि नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, कल्याण काळे, आनंद उबाळे, मैत्रेयी देशपांडे.

▪️ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती:

✓ स्थापना – फेब्रुवारी 2024

✓ सदर समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यासाठी नेमली होती.

✓ सदस्य – संजय नहार, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, राजा दीक्षित.

▪️मराठी भाषा दिनविशेष:

✓ मराठी भाषा गौरव दिन – 27 फेब्रुवारी

✓ मराठी अभिजात भाषा गौरव दिन – 3 ऑक्टोबर

✓ मराठी भाषा/राजभाषा – 1 मे

✓ जागतिक मातृभाषा दिन – 21 फेब्रुवारी

✓ मराठी राजभाषा अधिनियम – 1964

▪️मराठी भाषा विद्यापीठ:

✓ ठिकाण – रिद्धपूर (अमरावती)

✓ स्थापना – 1 जून 2024

✓ पहिले कुलगुरू – डॉ. अविनाश आवलगावकर

✓ रिद्धपूरमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला.

▪️भारतातील 22 अधिकृत भाषा:

✓ भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये सरकारने मान्य केले आहे की भारतात 22 अधिकृत भाषा आहेत.

✓ भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 ते 351 मध्ये भारताच्या अधिकृत भाषांशी संबंधित आहे.

✓ आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृती, सिंधी, उर्दू, तमिळ, तेलुगु, बोडो, डोंगरी, मैथली, संथाली.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading