बहुमताचे प्रकार

  • साधे बहुमत (Simple Majority)
    उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत
  • पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत (Absolute Majority)
    सभाग्रहातील एकूण सदस्य संख्येचे बहुमत (उदा. 545 सदस्यांच्या लोकसभेचे 273 एवढे बहुमत).
  • प्रभावी बहुमत (Effective Majority)
    सभाग्रहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय. उपराष्ट्रपती, राज्यसभा उपसभापती, लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्यासाठी प्रभावी बहुमताची आवश्यकता असते.
  • विशेष बहुमत (Special Majority)
    साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:
  • सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत
  • हजर व मतदानात भाग घेणार्‍या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत
  • पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्‍या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading