सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) – २०१५ ते २०३०


🔹 एकूण गोल्स – १७
🔹 घोषणा – सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट, न्यूयॉर्क
🔹 अंमलबजावणी कालावधी – 2015 ते 2030

१. दारिद्र्य निर्मूलन
➤ सर्व प्रकारचे दारिद्र्य संपवणे
➤ सामाजिक सुरक्षा प्रणाली मजबूत करणे

२. भूकमुक्ति व पोषण सुधारणे
➤ अन्न सुरक्षा आणि पोषण
➤ शाश्वत शेतीला प्रोत्साहन

३. सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण
➤ सर्व वयोगटांसाठी निरोगी जीवन
➤ माता व बालमृत्यू दरात घट
➤ संसर्गजन्य व गैर-संसर्गजन्य रोग नियंत्रण

४. गुणवत्तापूर्ण शिक्षण
➤ समान व समावेशक शिक्षण
➤ आजीवन शिक्षण संधी

५. लिंग समानता
➤ लिंग समानता आणि सशक्तीकरण
➤ लिंगाधारित हिंसा समाप्त

६. पेयजल व स्वच्छता
➤ स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सेवा
➤ जल व्यवस्थापन सुधारणा

७. स्वच्छ व परवडणारी ऊर्जा
➤ सर्वांसाठी ऊर्जेची उपलब्धता
➤ अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर

८. उत्पादक रोजगार आणि आर्थिक वाढ
➤ समावेशक आर्थिक वाढ
➤ बालमजुरी आणि मानवी तस्करी समाप्त

९. उद्योग, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा
➤ लवचिक व टिकाऊ पायाभूत सुविधा
➤ नवोपक्रम आणि R&D मध्ये गुंतवणूक

१०. विषमता कमी करणे
➤ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विषमता घट
➤ भेदभावाचे निर्मूलन

११. शाश्वत शहरे व वसाहती
➤ समावेशक, सुरक्षित आणि लवचिक शहरे
➤ झोपडपट्टी सुधारणा

१२. जबाबदार उपभोग व उत्पादन
➤ शाश्वत उत्पादन पद्धती
➤ अन्नवाया कमी करणे

१३. हवामान कृती
➤ हवामान बदलावर नियंत्रण
➤ आपत्कालीन तयारी

१४. जलजीवन (समुद्र व सागरी परिसंस्था)
➤ महासागरांचे संरक्षण व संवर्धन
➤ सागरी प्रदूषण घटवणे

१५. भूमीजीवन (जमिनीवरील परिसंस्था)
➤ जमिनीचा ऱ्हास व वाळवंटीकरण थांबवणे
➤ वनक्षेत्र व जैवविविधतेचे संरक्षण

१६. शांतता, न्याय व संस्थात्मक बळकटीकरण
➤ शांततापूर्ण व समावेशक समाज
➤ भ्रष्टाचार विरोध

१७. ध्येय गाठण्यासाठी जागतिक भागीदारी
➤ उत्तर-दक्षिण सहकार्य
➤ तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संसाधन बळकटीकरण

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading