I. प्राचीन काळातील परकीय प्रवासी
1.✅️ मेगस्थनीज (इ.स.पू. ४थे शतक, ग्रीस)
➤ चंद्रगुप्त मौर्य यांचा राजदूत
➤ ‘इंडिका’ नावाचा ग्रंथ लिहिला – भारतीय समाजरचना आणि प्रशासनाचे वर्णन
2.✅️ डेमॅकस (इ.स.पू. ३रे शतक, ग्रीस)
➤ बिंदुसार यांचा राजदूत
➤ शासनपद्धतीवर लेखन केले होते (ग्रंथ आता उपलब्ध नाही)
3.✅️ फॅक्सियन (इ.स. ५वे शतक, चीन)
➤ गुप्त राजवटीत भारतात प्रवास
➤ बौद्ध मठ, समृद्धी यांचे वर्णन (‘अ रेकॉर्ड ऑफ बौद्धिस्ट किंगडम्स’)
4.✅️ ह्यूएनसांग (झुआंजांग) (इ.स. ७वे शतक, चीन)
➤ सम्राट हर्षवर्धनाच्या काळात भारतभेट
➤ नालंदा विद्यापीठ, हर्षाची राज्यव्यवस्था आणि बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे निरीक्षण (‘सी-यू-की’)
5.✅️ ई-चिंग (Yijing) (इ.स. ७वे शतक, चीन)
➤ बौद्ध भिक्षूंचे जीवन आणि व्यापार मार्गांविषयी माहिती (‘अ रेकॉर्ड ऑफ बौद्धिस्ट प्रॅक्टिसेस’)
II. मध्ययुगीन काळातील परकीय प्रवासी
1.✅️ अल-मसुदी (इ.स. १०वे शतक, इराक)
➤ गुजरात व मालबार भागातील व्यापाराचे वर्णन (‘मीडोज ऑफ गोल्ड’)
2.✅️ अल-बिरुनी (इ.स. ११वे शतक, पर्शिया)
➤ महमूद घझनीच्या आक्रमणकाळात भारतात
➤ ‘किताब-उल-हिंद’ – भारतीय विज्ञान, समाजशास्त्र व धर्मावरील ग्रंथ
3.✅️ मार्को पोलो (इ.स. १३वे शतक, इटली)
➤ दक्षिण भारताची (विशेषतः पांड्य राज्य) समृद्धी व वैभवाचे वर्णन
4.✅️ इब्न बतूता (इ.स. १४वे शतक, मोरोक्को)
➤ मोहम्मद बिन तुगलकाच्या काळात भारतभेट
➤ ‘रिहला’ (अरबी ग्रंथ) – भारतीय समाज, प्रशासन व दरबाराचे तपशील
5.✅️ निकोलो कॉन्टी (इ.स. १५वे शतक, इटली)
➤ विजयनगर साम्राज्याच्या समृद्धीचे कौतुक
6.✅️ अथानासियस निकितीन (इ.स. १५वे शतक, रशिया)
➤ ‘द जर्नी बियॉन्ड थ्री सीज’ – भारतातील व्यापार, चालीरीती, धार्मिक प्रथा यांचे वर्णन
7.✅️ अब्दुल रज्जाक (इ.स. १५वे शतक, पर्शिया)
➤ विजयनगर साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन
III. आधुनिक काळातील परकीय प्रवासी
1.✅️ दुआर्टे बार्बोसा (इ.स. १६वे शतक, पोर्तुगाल)
➤ मालबार भागातील मसाल्यांच्या व्यापाराचे सविस्तर वर्णन
2.✅️ फर्नाओ नुनिझ (इ.स. १६वे शतक, पोर्तुगाल)
➤ विजयनगर साम्राज्याचा इतिहास लेखबद्ध केला
3.✅️ डोमिंगो पायस (इ.स. १६वे शतक, पोर्तुगाल)
➤ विजयनगरचे जिवंत वर्णन
4.✅️ थॉमस रो (इ.स. १७वे शतक, इंग्लंड)
➤ मुघल प्रशासनाचे तपशीलवार वर्णन केले
5.✅️ जीन-बॅपटिस्ट टॅव्हर्नियर (इ.स. १७वे शतक, फ्रान्स)
➤ भारताला सहा वेळा भेट; हिरे आणि खाणकाम याचे विस्तृत वर्णन
6.✅️ विल्यम हॉकिंस (इ.स. १७वे शतक, इंग्लंड)
➤ सम्राट जहांगीर यांचे राजदूत
7.✅️ फ्राँकोइस बर्नियर (इ.स. १७वे शतक, फ्रान्स)
➤ मुघल राजदरबारात दारा शिकोह यांचे वैद्य म्हणून कार्यरत

Leave a Reply