Bernoulli Principle / बर्नोली तत्व ( राज्यसेवा पूर्व 2023, 2024 प्रश्न)



बर्नोली प्रिन्सिपल:
वाहणाऱ्या द्रव (पाणी, हवा इ.) चा वेग वाढला तर दाब कमी होतो आणि वेग कमी झाला तर दाब वाढतो.

✔️ वेग ↑ → दाब ↓
✔️ वेग ↓ → दाब ↑
हे तत्त्व यांनी मांडले.

बर्नोली समीकरण(वर फोटो दिला आहे)
P = दाब (Pressure)
ρ = द्रवाची घनता
v = द्रवाचा वेग
g = गुरुत्वीय त्वरण
h = उंची

बर्नोली समीकरणानुसार दाब ऊर्जा + गतिज ऊर्जा + स्थितिज ऊर्जा यांची एकूण बेरीज स्थिर राहते.

संकल्पना समजून घ्या
समजा नदी किंवा पाइप अचानक अरुंद झाला:
⊳ अरुंद भागातून तेवढेच पाणी नेण्यासाठी द्रवाचा वेग वाढतो
⊳ वेग वाढल्यामुळे दाब कमी होतो
⊳ त्यामुळे जिथे वेग जास्त तिथे दाब कमी असतो.

साधी उदाहरणे
कागद प्रयोग
⊳ कागदाची पट्टी ओठाखाली धरून वरून फुंकर मारावी
⊳ वरून हवा वेगाने जाते
⊳ वरचा दाब कमी होतो
⊳ खालील जास्त दाबामुळे कागद वर उचलला जातो.

दोन फुगे
⊳ दोन फुग्यांच्या मधे हवा फुंकल्यास फुगे दूर जाण्याऐवजी जवळ येतात
⊳ मधला दाब कमी होतो
⊳ बाहेरील जास्त दाब त्यांना आत ढकलतो.

बर्नोली प्रिन्सिपलचे उपयोग
1) विमानाचे पंख
च्या पंखाच्या वरच्या भागातून हवा अधिक वेगाने जाते.
⊳ वरचा दाब कमी होतो
⊳ खालचा दाब जास्त राहतो
⊳ विमानाला वर उचलणारे Lift Force तयार होते
उदाहरण: प्रवासी विमान उड्डाण.

2) स्प्रे / अत्तर फवारणी
⊳ वेगाने जाणारी हवा कमी दाब निर्माण करते
⊳ द्रव वर खेचला जातो
⊳ फवारणी बाहेर पडते
उदाहरण: परफ्यूम स्प्रे, सॅनिटायझर स्प्रे.

3) Aspiration / Aspirator Pump
⊳ पाणी अरुंद नळीमधून वेगाने वाहते
⊳ वेग वाढल्याने दाब कमी होतो
⊳ कमी दाबामुळे हवा किंवा वायू आत खेचले जातात
उपयोग: प्रयोगशाळेमध्ये व्हॅक्यूम तयार करण्यासाठी.

4) Venturi Pump
⊳ अरुंद भागात द्रवाचा वेग वाढतो
⊳ दाब कमी होतो
⊳ दुसरा द्रव किंवा वायू आत खेचला जातो
उदाहरण: रासायनिक उद्योग, पाणी शुद्धीकरण.

5) Venturi Meter
⊳ पाइपमध्ये अरुंद भाग तयार केला जातो
⊳ वेग आणि दाबातील फरक मोजला जातो
⊳ त्यावरून प्रवाह मोजतात
उपयोग: उद्योगांमध्ये द्रव प्रवाह मोजणे.

6) कार्ब्युरेटर
⊳ हवा वेगाने वाहते
⊳ दाब कमी होतो
⊳ पेट्रोल आत खेचले जाते
⊳ हवा आणि इंधनाचे मिश्रण तयार होते
उदाहरण: जुन्या मोटारसायकली.

7) प्रवाहाची गती मोजणे
⊳ नद्या, पाइपलाइन, पाण्याचा वेग यासाठी बर्नोली तत्त्व वापरतात
उदाहरण:
⊳ धरणातील पाण्याचा प्रवाह
⊳ औद्योगिक पाइपलाइनमधील द्रव प्रवाह.

8) चक्रीवादळात छत उडणे
⊳ छतावरून हवा वेगाने जाते
⊳ वरचा दाब कमी होतो
⊳ घरातील दाब जास्त राहतो
⊳ छत वर उचलले जाऊ शकते

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading