नीती आयोगाच्या दुसऱ्या महिला सीईओ निधी छिब्बर⭐️

⭐️ २४ फेब्रुवारी २०२६ रोजी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी छिब्बर (Nidhi Chhibber) यांनी नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

⭐️ त्या १९९४ च्या बॅचच्या छत्तीसगड कॅडरच्या अधिकारी असून, नियमित नियुक्ती होईपर्यंत त्या या पदावर राहतील. 

⭐️ सध्याचा अतिरिक्त कार्यभार: निधी छिब्बर (२४ फेब्रुवारी २०२६ पासून).

⭐️ पार्श्वभूमी: त्या सध्या नीती आयोगाच्या ‘डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस’च्या (DMEO) महासंचालक म्हणून काम पाहत होत्या.

⭐️ मागील सीईओ: बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम (२५ फेब्रुवारी २०२३ – २४ फेब्रुवारी २०२६). 

⭐️ सिंधुश्री खुल्लर (Sindhushree Khullar) नीती आयोगाच्या पहिल्या महिला सीईओ होत्या. त्या १९७५ च्या बॅचच्या (UT केडर) आयएएस अधिकारी होत्या आणि २०१५ मध्ये नीती आयोगाची स्थापना झाल्यावर त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading