1] नाम –
जे शब्द वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम म्हणतात.
उदाहरण – घर, आकाश, गोड, गणेश…
2] सर्वनाम –
जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात, त्यांना सर्वनाम म्हणतात.
उदाहरण – मी, तू, आम्ही, हा, जो, तो, कोण…
3] विशेषण –
जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती देतात, त्यांना विशेषण म्हणतात.
उदाहरण – गोड, उंच, सुंदर, चपळ, चातुर…
4] क्रियापद –
जे शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, त्यांना क्रियापद म्हणतात.
उदाहरण – बसणे, पळणे, जातो…
5] क्रियाविशेषण –
जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात, त्यांना क्रियाविशेषण म्हणतात.
उदाहरण – इथे, तिथे, आज, उद्या…
6] शब्दयोगी अव्यय –
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडतात आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
उदाहरण – झाडाखाली, त्यासाठी…
7] उभयान्वयी अव्यय –
जे शब्द दोन शब्द किंवा वाक्यांना जोडतात, त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
उदाहरण – व, आणि, किंवा, परंतु…
8] केवलप्रयोगी अव्यय –
जे शब्द आपल्या मनातील भावना व्यक्त करतात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.
उदाहरण – अरेरे, अबब…

Leave a Reply