· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात.
· शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडलेले असतात.
· शब्दयोगी अव्ययचे पंधरा प्रकार आहेत.
- स्थलवाचक:
· आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.
· उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ आहे.
2. घरामध्ये मोठा साप आहे.
- हेतुवाचक:
· करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.
· उदा. 1. यश मिळवण्यासाठी मेहनत लागते.
2. जगण्यासाठी अन्न हवे आहे.
- व्यतिरेकवाचक:
· विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त
· उदा. 1. तुझ्याशिवाय मला करमत नाही.
2. त्याच्या खेरीज दुसरा कोणताही चालेल.
- तुलनात्मक:
· पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.
· उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारीक आहे.
2. गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.
- योग्यतावाचक:
· समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.
· उदा. 1. तो ड्रेस माझ्या सारखा आहे.
2. आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.
- संग्रहवाचक:
· सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त, इ.
· उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईन.
2. रामही भक्तासाठी धावून येईल.
- कैवल्यवाचक:
· च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.
· उदा. 1. विराटच सामना जिंकवेल.
2. किरण मात्र आमच्यासोबत येणार नाही.
- संबंधवाचक:
· विशी, विषयी, संबंधी इ.
· उदा. 1. देवाविषयी मनात भक्ति आहे.
2. त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.
- संबंधवाचक:
· संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.
· उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.
2. आमच्या सह तो पण येणार आहे.
- विनिमयवाचक:
· बद्दल, एवजी, जागी, बदली इ.
· उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.
2. सूरजची बदली पुण्याला झाली.
- दिकवाचक:
· प्रत, प्रती, कडे, लागी इ.
· उदा. 1. या पेपरच्या दहा प्रत काढून आण.
2. त्याच्याकडे पैसे दिले आहेत.
- विरोधवाचक:
· विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.
· उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.
2. त्याने उलट माझीच माफी मागितली.
- परिणामवाचक:
· भर
· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.
2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.

Leave a Reply