महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा

⭕️ कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा

⭕️ भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय

⭕️ हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

क्लूप्त्या : ‘शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली’

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग

⭕️ बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.

⭕️ द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.

क्लुप्ती : “अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला””

अन्ना = अनायमुडी – २६९५

दोन = दोडाबेटा – २६३

गुरु = गुरुशिखर – १७२२

काळूबाई = कळसुबाई – १६४६

धूप = धुपगड = १३५०

⭕️ भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : “कृत्ति” मुंगूस.

कृ – कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति – तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू – मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स – ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)

⭕️ भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

क्लुप्ती : “MIM BSP”

M – म्यानमार

I – इंडोनेशिया

M – मालदीव

B – बांगलादेश

S -श्रीलंका

P – पाकिस्तान

⭕️ आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ – ऊर्जा

⭕️ सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “सविता वेग वजन बग “

स – संवेग

वि – विस्थापन

त – त्वरण

वेग

वजन

ब – बल

ग – गती

⭕️ दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने

क्लुप्ती : ऑबिलीपी

ऑ – अन्थ्रासाईड

बी  – बिटूमिंस

लि – लिग्नाईट

पी – पिट

⭕️  महाराष्ट्रातील घाट

आंबा घाट – कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना – मुंबई ते नाशिक – थळ घाट

बापुचादिवा – पुणे ते बारामती – दिवा घाट.

कुंभा चिपक – कराड ते चिपळूण – कुंभार्ली घाट

खांबाला पूस – पुणे ते सातारा – खंबाटकी घाट.

फोकोगा – फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस – मुंबई ते नाशिक – कसारा घाट

⭕️ सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   –  अजिंठा

हे    –  हरिश्चंद्र

मी   – महादेव

⭕️ सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   –  अजिंठा

हे    –  हरिश्चंद्र

मी   – महादेव

⭕️ महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ –  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी

⭕️  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

क्लूप्त्या : ‘गोभीकृतान ‘

गो – गोदावरी

भी – भीमा

कृ – कृष्णा

ता – तापी

न – नर्मदा.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading