जानेवारी 2025 चालू घडामोडी

01) जगातील पहिले बहुराष्ट्रीय आयआयटी बनण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागतिक स्तरावर पुढाकार घेतला आहे ?
👉 आयआयटी मद्रास

02) दृष्टिहीनांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे ?
👉 उत्तर प्रदेश

03) कोणत्या देशाने अलिकडेच तैमूर नावाच्या हवेतून सोडल्या जाणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?
👉 पाकिस्तान

04) वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेले मनोज कोठारी कोणत्या खेळाशी संबंधित होते ?
👉 बिलियर्ड्स

05) संगीत कलानिधी पुरस्कार 2026 ने सन्मानित झालेले आर.के. श्रीरामकुमार कोणत्या वाद्याशी संबंधित होते ?
👉 व्हायोलिन

06) बेंगळुरू येथे झालेल्या 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले ?
👉 कर्नाटक

07) ‘खुतबत-ए-मोदी: फ्रॉम द रेड फोर्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले ?
👉 धर्मेंद्र प्रधान

08) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य म्हणून अलीकडेच कोणत्या देशांची नियुक्ती करण्यात आली ?
👉 बहरीन, कोलंबिया, काँगो, लाटविया
आणि लायबेरिया

09) सागरी सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्यासाठी अमित शाह यांनी एकात्मिक सुरक्षा केंद्र कोठे सुरू केले ?
👉 अंदमान आणि निकोबार बेटे

10) भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे ?
👉 उर्सुला वॉन डेर लेयन
आणि अँटोनियो कोस्टा

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading