ध्वनी : महत्त्वाचे मुद्दे

● ध्वनीची निर्मिती
● ध्वनी ऊर्जा आहे.
● ध्वनी वस्तूच्या कंपनामुळे तयार होतो.
● कंपन म्हणजे वस्तूचा जलद पुढे-मागे हालचाल करणे.
● ध्वनीलहरी अनुदैर्घ्य (Longitudinal) असतात.
● ध्वनीलहरी यांत्रिक आहेत, विद्युतचुंबकीय नाहीत.

● ध्वनीचे प्रसारण
● ध्वनीला प्रसारणासाठी माध्यम लागते.
● माध्यम वायू, द्रव किंवा घन असू शकते.
● ध्वनी निर्वातात प्रवास करू शकत नाही.
● माध्यमातील कण मूळ स्थितीतून हलतात.
● ऊर्जा एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे जातात.
● कणांची हलचाल ध्वनीच्या दिशेला असते.

● ध्वनीचा वेग
● ध्वनीचा वेग माध्यमावर अवलंबून असतो.
● वेगाचा क्रम – घन > द्रव > वायू.
● तापमान वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो.
● आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो.
● घनता वाढल्यास ध्वनीचा वेग कमी होतो.
● समान स्थितीत सर्व वारंवारतेसाठी ध्वनीचा वेग जवळपास समान असतो.

● ध्वनीची वैशिष्ट्ये
● वारंवारता (Frequency)
● प्रति सेकंद होणाऱ्या कंपनांची संख्या.
● एकक – हर्ट्झ (Hz).
● वारंवारतेवर ध्वनीचा उच्च-नीचपणा ठरतो.
● जास्त वारंवारता – तीव्र (High Pitch) ध्वनी.
● कमी वारंवारता – मंद (Low Pitch) ध्वनी.

● आयाम (Amplitude)
● कणांचे मूळ स्थितीपासून जास्तीत जास्त विचलन.
● आयामावरून ध्वनीची तीव्रता ठरते.
● जास्त आयाम – मोठा आवाज.
● कमी आयाम – हळू आवाज.
● तीव्रतेचे एकक – डेसिबल (dB).

● तरंगलांबी (Wavelength)
● दोन सलग संपीडन किंवा विरलनांमधील अंतर.

● श्राव्य व अश्राव्य ध्वनी
● मानवी कान फक्त विशेष वारंवारतेतील ध्वनी ऐकू शकतो.

● घन माध्यमातील ध्वनीचा वेग
● ॲल्युमिनियम
● निकेल
● स्टील
● लोखंड
● पितळ
● काच
● तांबे
● रबर

● ध्वनीचा प्रवास भूकंपाच्या प्राथमिक लहरीप्रमाणे होतो.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading