भारतीय व्हाइसरॉयंचा इतिहास: प्रमुख घटना व बैठक

👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :
सिंधू नदीच्या पलीकडे वहाबीविरुद्ध लढाई केली. धर्मशाला येथे भारतात आल्यावर २० महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला.

👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :
सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांसाठी टेनन्सी अ‍ॅक्ट पारित केला. त्यांनी १८६८ मध्ये कूळ कायदा लागू केला. त्यांच्या काळात दोन दुष्काळ आले. १८६८ मध्ये ओरिसात आणि १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. त्यांनी फेमीन कमिशन स्थापन केली आणि दुष्काळ कशामुळे झाला यावर समिती नेमली. सिंचन खाते स्थापन केले आणि रिचर्ड स्ट्रची यांना प्रमुख बनवले. सिमला ग्रीष्मकालीन राजधानी ठरवली.

👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :
सर जॉन लॉरेन्सच्या नंतर मेयो व्हाइसरॉय बनला. १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. त्यांनी विकास कार्यात कपात केली आणि करात सुधारणा केली. मेयोने स्थानिक शासन समित्या स्थापन केल्या. अजमेरमध्ये शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज सुरू केले. १८७२ मध्ये भारतात पहिल्यांदा जनगणना झाली. त्याचा मृत्यू एका पठाणाकडून झाला.

👉 लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :
लॉर्ड नॉर्थब्रुक १८७२ मध्ये व्हाइसरॉय झाला. त्याने दुष्काळ निवारणासाठी तांदूळ आयात केला आणि खर्च केला. त्याला पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला. मुंबईत आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. त्याचा राजीनामा इंग्लंडमध्ये वादामुळे झाला.

👉 लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)
लॉर्ड लिटन कट्टर साम्राज्यवादी होता. १८७६-७७ मध्ये दुष्काळ झाला, ज्यामुळे ५० लाख लोक मरण पावले. लिटनने दुष्काळ निवारणासाठी समिती स्थापन केली. दुसरे अफगाण युद्ध लिटनच्या धोरणामुळे झाले. दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियाने भारतास सम्राज्ञी म्हणून जाहीर केले. देशी वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा कायदा पास झाला.

👉 लॉर्ड रिपन (१८८०-१८८४)
त्याला उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखतात. त्यांनी कामगारांसाठी फॅक्टरी अ‍ॅक्ट १८८१ मध्ये पारित केला. भारतीय शिक्षणाबाबत समिती स्थापन केली. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला आणि भारतीयांना नियुक्त केले. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये झाली.

👉 लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८)
डफरिनच्या काळात संपूर्ण ब्रम्हदेश इंग्रजांच्या नियंत्रणात आला. त्यांनी लोकसेवा आयोगाची स्थापना केली. अ‍ॅलन ‘ाुमने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.

👉 लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४)
भारतीय विधिमंडळ कायदा १८९२ संमत झाला. त्यांनी अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. कामकाजी महिलांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट पारित केला.

👉 लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९)
१९०० च्या भीषण दुष्काळात अन्नधान्य आयात केले, पण याच काळात प्लेगचा प्रादुर्भाव झाला.

👉 लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)
कर्झनने दुष्काळ निवारणासाठी समिती स्थापन केली. त्याने भारतीय चलन कायदा पारित करून सुवर्णप्रमाण स्वीकारले. बंगालची फाळणी केल्याने त्याला वाद निर्माण झाला.

👉 कर्झनच्या शेती सुधारणा :
जमिनीच्या हस्तांतराचा कायदा बनवला. शेतकी खात्याची स्थापना केली. अनेक नवीन रेल्वेमार्ग बांधले.

👉 लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०)
बंगाल फाळणीच्या काळात कायदे तयार केले. चीनशी अफू व्यापार बंद केला.

👉 लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६)
लोकप्रिय व्हाइसरॉय, ज्याने दिल्ली दरबार आयोजित केला. त्याच्या काळात बंगालची फाळणी रद्द झाली.

👉 लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६–१९२१)
माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा पारित केला. जालियानवाला बाग हत्याकांड घडले.

👉 लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६)
रिडिंगच्या काळात काँग्रेसमध्ये गट विभाजन झाले.

👉 लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)
सायमन कमिशन भारतात आले. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.

👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६)
दुसऱ्या गोलमेज परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली. भारत सरकार अधिनियम, १९३५ पारित झाला.

👉 लॉर्ड लिनलिथगो (१९३६-१९४३)
भारतीय कृषी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. दोन्ही महायुद्धांच्या काळात भारतीय सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची घोषणा केली.

👉 लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७)
कारण युद्ध समाप्त झालं. राजकीय पेच प्रसंग सोडवण्यासाठी बठक बोलावली.

👉 लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८)
भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या पहिल्या गव्हर्नर जनरल बनले.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading