वर्णमाला
वर्ण – आपल्या तोंडावाटे पडणार्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.
मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
- स्वर
- स्वरादी
- व्यंजन
- स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ
स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
- र्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हस्व स्वर असे म्हणतात.
अ, इ, ऋ, उ - दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार
- सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ - विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
अ-ई, उ-ए, ओ-ऋ - संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.
ए – अ+इ/ई
ऐ – आ+इ/ई
ओ – अ+उ/ऊ
औ – आ+उ/ऊ - स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी
दोन स्वरादी – अं, अः
स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरदी : ओ, औ
हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा. बॅट, बॉल
3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
- स्पर्श व्यंजन (25)
- अर्धस्वर व्यंजन (4)
- उष्मा, घर्षक व्यंजन (3)
- महाप्राण व्यंजन (1)
- स्वतंत्र व्यंजन (1)

Leave a Reply