अंदाज समिती

अंदाज समिती (Estimates Committee) – आयोगाने विचारलेले महत्त्वाचे मुद्दे

🔹️स्थापना व सदस्यसंख्या
➤ अंदाज समितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार १९५० मध्ये करण्यात आली.

🔹️सदस्यत्वाची अटी
➤ राज्यसभेचे सदस्य या समितीचे सदस्य नसतात.
➤ मंत्री सदस्य होऊ शकत नाहीत.
➤ समितीमध्ये लोकसभेतील सर्व पक्ष आणि गटांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते.
➤ सदस्यांची निवड एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने (Single Transferable Vote) केली जाते.

🔹️अध्यक्षपद व कार्यकाळ
➤ जर उपसभापती समितीचे सदस्य असतील , तर ते आपोआप अध्यक्ष होतात.
➤ अन्यथा, सभापती सदस्यांमधून अध्यक्ष नियुक्त करतात.
➤ सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो.

🔹️कार्य व भूमिका
➤ प्रशासनातील कार्यक्षमता आणि काटकसर वाढवण्यासाठी पर्यायी धोरणे सुचवणे.
➤ संसदेसमोर सादर होणाऱ्या अनुमानांचा आराखडा तपासणे व सूचना करणे.
➤ अनुमानात नमूद केलेल्या आर्थिक मर्यादेनुसार नियोजनाची अंमलबजावणी झाली का याचे परीक्षण करणे.
➤ शासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे, काटकसर आणि आर्थिक प्रशासनातील सुधारणा सुचवणे.

🔹️विशेष वैशिष्ट्य
➤ या समितीला ‘सतत मितव्ययिता समिती’ (Continuous Economy Committee) असेही म्हणतात.
➤ फक्त लोकसभेतील सदस्यांनाच या समितीमध्ये स्थान असते — राज्यसभेचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading