महाराष्ट्राचे लोकायुक्त

♦️स्थापना व नियुक्ती
🔹️ लोकायुक्त संस्था २६ ऑक्टोबर, १९७२ रोजी अस्तित्वात आली.
🔹️ लोकायुक्तांची नेमणूक महाराष्ट्राचे राज्यपाल करतात.
🔹️ लोकायुक्त पदाचा कार्यकाल ५ वर्षांचा निश्चित आहे.

♦️संस्थेचे स्वरूप
🔹️ लोकायुक्त ही स्वतंत्र वैधानिक (Statutory) संस्था आहे.
🔹️ महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते ज्याने लोकायुक्त संस्था निर्माण केली.
🔹️ ही संस्था शासनाच्या कारभारावर ‘पहरेदार’ म्हणून कार्य करते.

♦️पहिले लोकायुक्त व संबंधित व्यक्ती
🔹️ न्यायमूर्ती एस. पी. कोतवाल हे महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त होते.
🔹️ न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी न्यायालयीन सक्रियतेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली —
➤ “ज्या न्यायालयीन कृतीने कार्यकारी व कायदे मंडळाच्या क्षेत्रात अतिक्रमण होते ती कृती म्हणजे न्यायालयीन सक्रियता.”

♦️कायदे व अधिकार क्षेत्र
🔹️ महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त अधिनियम १९७१ अंतर्गत लोकायुक्त व उप-लोकायुक्त यांचे अधिकार, कार्य व अधिकार क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
🔹️ लोकपाल विधेयकात (Bill) लाचलुचपतीस आळा घालण्यासाठी आवश्यक तरतुदी आहेत.
🔹️ लोकायुक्त किंवा लोकपालांना परकीय संबंधांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचा अधिकार नाही.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading