1.रक्ताचे प्रमाण:
➤ शरीराच्या एकूण वजनाच्या सुमारे 8% भाग म्हणजे रक्त.
➤ शरीराच्या सुमारे 60% भागात पाणी असते.
2.अभ्यासशाखा:
➤ रक्ताचा शास्त्रीय अभ्यास Haematology म्हणून ओळखला जातो.
3.घटनात्मक स्वरूप:
➤ रक्त हे संयोजी ऊतीचे (Connective Tissue) एक प्रकार आहे.
4.pH मूल्य:
➤ रक्ताचा pH 7.35 ते 7.45 असतो, म्हणजेच ते अल्कलीन (Basic) स्वरूपाचे असते.
5.रक्ताचे प्रमाण:
➤ प्रौढ मानवी शरीरात सुमारे 5 लिटर रक्त असते.
6.विशिष्ट गुरुत्व (Specific Gravity):
➤ रक्ताचे विशिष्ट गुरुत्व 1.035 ते 1.075 दरम्यान असते.
7.रक्ताची कार्ये:
✅️ ➤ वायूंचे परिवहन (ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड)
✅️ ➤ पोषणतत्वांचे परिवहन (ग्लुकोज, अमिनो आम्ल, लिपिड्स इ.)
✅️ ➤ टाकाऊ पदार्थांचे अपसारण (युरिया, क्रिएटिनीन इ.)
✅️ ➤ शरीर संरक्षण (प्रतिजैविके, श्वेत रक्तपेशी)
✅️ ➤ संप्रेरक व विकरांचे परिवहन
✅️ ➤ तापमानाचे नियमन

Leave a Reply