1) कॅल्शिअम (Calcium):
कार्य :
- दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षार असून शरीरातील एकूण कॅल्शिअमपैकी 90% कॅल्शिअम हाडांमध्ये आढळते व त्यामुळेच हाडांना कठीणपणा येतो.
- हृदय, स्नायू आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
•रक्त निर्मितीसाठी तसेच त्याच्या कार्यासाठी मदत करणे.
2) फॉस्फरस (Phosphorus):
◇ कार्य :
- दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते.
- पेशीतील DNA आणि RNA या न्यूक्लिक आम्लाच्या रचनेतील फॉस्फरिक आम्ल तयार करण्यासाठी आवश्यक असते.
- पेशीमध्ये ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणानंतर मुक्त झालेल्या उष्णता ऊर्जेचे रूपांतर ATP या रासायनिक संयुगामध्ये करण्यासाठी आवश्यक
3) सोडिअम (Sodium):
◇ कार्य :
- सोडिअमचे आयन रक्तामध्ये उत्तम प्रकारचे विद्युत अपघटनी क्षार म्हणून कार्य करतात त्यामुळे रक्ताचा परासरण दाब (Osmotic Pressure) नियंत्रित केला जातो.
- सोडिअममुळे ATP ऊर्जा आणि पोटॅशिअम यांचे नियमन केले जाते.
4) पोटॅशिअम (Potassium) :
कार्य (Functions) :
रक्तामध्ये विद्युत अपघटनी क्षार म्हणून परासरण दाब नियंत्रित करणे.
शरीरात ATP ऊजरिणू आणि सोडिअम यांचे नियमन करणे.
5) मॅग्नेशिअम (Magnesium) :
कार्य (Functions):
◇ याचा सर्वाधिक उपयोग ATP रेणूच्या निर्मितीमध्ये तसेच हाडांच्या विकासासाठी होतो.
6) लोह (Iron) :
◇कार्य :
- शरीरात प्रथिने तसेच विकरांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.
- याचा सर्वाधिक उपयोग तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी होतो.
- आपल्या शरीरातील एकूण लोहापैकी 75% लोह रक्तात असते, व त्यातील 90% लोहाचा पुनर्वापर होतो.
- रक्तामध्ये हिमोग्लोबिन तसेच स्नायूंमध्ये मायोग्लोबीन मधील लोह ऑक्सिजनच्या वहनाचे कार्य करते.
- लोहामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता तसेच ऊर्जानिर्मिती नियंत्रित केली जाते.
7) आयोडिन (Iodine):
◇कार्य :
- आयोडिनला आपल्या शरीरात सर्वात मौल्यवान क्षार म्हणतात. कारण आयोडिनमुळे थायरॉइड ग्रंथीतून थायरॉक्झीन (T₁) आणि ट्राय-आयोडोथायरॉनॉईन (T₁) यासारखी संप्रेरके तयार होतात.
- थायरॉक्झीन हे संप्रेरक शारीरिक तसेच मानसिक वाढीसाठी, मेंदू व चेतासंस्थेच्या वाढीसाठी, कर्बोदकांच्या चयापचयासाठी तसेच स्निग्ध पदार्थाच्यो जलद विघटनासाठी आवश्यक असते.
- आयोडिन आपल्या शरीरात ऑक्सिडन विरोधी (Antioxidant) म्हणून सस्तनी ग्रंथी तसेच लाळ ग्रंथीमध्ये कार्य करतो.
8). फ्लोरिन (Flourine):
◇ कार्य :
- फ्लोरिन हे अतिशय अस्थीर मूलद्रव्य असल्याने निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. आपल्या शरीरात सुमारे 96% फ्लोराइड दात व हाडांमध्ये आढळतो, त्यांचे क्षारीकरण करतो.
- दातांचे एनॅमल/दंतीन तयार होण्यासाठी फ्लोरिनची आवश्यकता असते. त्यामुळे दाताना चमक व मजबुती प्राप्त होते.

Leave a Reply