🔸१) अणूमधील विविध कण एका विशिष्ट बलाने एकत्र बांधले जातात. या बलास …. म्हणतात.
- आण्विक ऊर्जा
🔹२) द्रवाचे छोटे थेंब गोल असतात; यामागील तत्त्व …..
- पृष्ठताण
🔸३) एखाद्या जड अणुकेंद्राचे दोन अणुकेंद्रांमध्ये विभाजन होण्याच्या प्रक्रियेस कोणती संज्ञा आहे?
- फिशन
🔹४) जीवनदायी वातावरण जाणीवपूर्वक नष्ट करण्याच्या कृतीस ….. ही संज्ञा आहे. – इकोसाईड
🔸५) जेव्हा काचेच्या लोलकामधून पांढरा प्रकाश जातो, तेव्हा सर्वाधिक प्रणमन (रिफ्रॅक्शन) होणारा रंग …. हा होय.
- निळा
🔸१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी आणि ग्रामपंचायतीने संमत केलेले ठराव यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार…. यांना असतात.
- सरपंच
🔹२) प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गा साठी ठेवावयाची सरपंचांची पदे शक्यतो त्या जिल्ह्यातील सरपंचांच्या एकूण पदसंख्येच्या …. असतात.
- सत्तावीस टक्के
🔸३) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतील नवीन सुधारणां
नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग आणि स्त्रिया यांसाठी राखून ठेवावयाच्या सरपंचाच्या पदांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- राज्य शासन
🔹४) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ५७ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी ‘व्हिलेज फंडा’ ची तरतूद आहे. हा फंड सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी …. वर असते.
- ग्रामपंचायत सचिव
🔸५) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६० अन्वये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा ग्रामपंचायतींच्या गटां साठी एक किंवा अधिक ग्रामपंचायत सचिव असतात. ग्रामपंचायत सचिवांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
🔸१) उपसरपंचांची सरपंच म्हणून निवड झाल्यास…..
- उपसरपंचांचे पद रिक्त होईल.
🔹२) प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री- प्रतिनिधींसाठी….. जागा राखीव असतात.
- एक-द्वितीयांश
🔸३) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी तो …. कडे सादर करावा लागतो.
- सरपंच
🔹४) संबंधित खेड्यातील अनुसूचित जाति-जमातींची लोक संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाति जमातींच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १० (२) (अ) अनुसार …. यांना आहेत.
- राज्य निर्वाचन आयोग
🔸५) आपली कर्तव्ये करताना केलेली गैरवर्तणूक, कर्तव्ये पार पाडताना दाखविलेला निष्काळजीपणा वा असमर्थता कारणांवरून सरपंच, उपसरपंच वा ग्रामपंचायत सदस्य यांना पदावरून दूर करता येते. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कलम ३९ अन्वये हे अधिकार आहेत ….
- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला
🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत?
- मध्य प्रदेश
🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे?
- वित्त आयोग
🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम …. मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५
🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू
🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त …. इतकी राहणार आहे.
- १२
🔸१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम १४५ मधील तरतुदींनुसार ग्रामपंचायत विसर्जित करण्यात आल्यास नव्याने ग्रामपंचायतीची रचना होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा ताबा राज्य शासनाकडे येतो. हे विधान …..
- बरोबर आहे.
🔹२) ग्रामपंचायत विसर्जित झाल्याच्या दिनांकापासून ग्राम पंचायत सदस्यांना आपली पदे रिक्त करावी लागतात व ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये राज्य शासनाने वेळोवेळी नियुक्त केलेल्या व्यक्ती पाहतात. हे विधान महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ….मधील तरतुदींना धरून आहे.
- कलम १४५
🔸३) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधि नियम, १९६१ …. या जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रास लागू आहे.
- मुंबई शहर व मुंबई उपनगर
🔹४) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमातील कलम …. अनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेची तरतूद करण्यात आली आहे.
- सहा
🔸५) जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खात्याचे प्रमुख हे …. वर्ग १ वा २ चे राजपत्रित अधिकारी असतात.
- राज्यसेवेतील
🔸१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम १४५ मधील तरतुदींनुसार ग्रामपंचायत विसर्जित करण्यात आल्यास नव्याने ग्रामपंचायतीची रचना होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा ताबा राज्य शासनाकडे येतो. हे विधान …..
- बरोबर आहे.
🔹२) ग्रामपंचायत विसर्जित झाल्याच्या दिनांकापासून ग्राम पंचायत सदस्यांना आपली पदे रिक्त करावी लागतात व ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये राज्य शासनाने वेळोवेळी नियुक्त केलेल्या व्यक्ती पाहतात. हे विधान महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ….मधील तरतुदींना धरून आहे.
- कलम १४५
🔸३) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधि नियम, १९६१ …. या जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रास लागू आहे.
- मुंबई शहर व मुंबई उपनगर
🔹४) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमातील कलम …. अनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेची तरतूद करण्यात आली आहे.
- सहा
🔸५) जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खात्याचे प्रमुख हे …. वर्ग १ वा २ चे राजपत्रित अधिकारी असतात.
- राज्यसेवेतील
🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ….
- १४,९६,००,००० कि. मी.
🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग ….
- २,९९,७९२ कि. मी.
🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह
- बुध
🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला …. हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
- गुरु
🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या …. इतके आहे.
- ३१८ पट
🔸१) …. याच्या कारकिर्दीत पंजाब राज्य खालसा करून ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले.
- लॉर्ड डलहौसी
🔹२) दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण मोठ्या प्रमाणावर अमलात आणले ….
- लॉर्ड डलहौसी
🔸३) इ. स. १८५४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नियामक मंडळाच्या …. या अध्यक्षांनी आपल्या खलित्याद्वारे वा सूचनापत्राद्वारे जनसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा आदेश तत्कालीन भारत सरकारला दिला.
- सर चार्लस् वूड
🔹४) सन १८५७ चा उठाव घडून आला लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीत; पण या उठावाची बरीचशी बीजे रुजली होती …. याच्या कारकिर्दीतच.
- लॉर्ड डलहौसी
🔸५) कोणत्या गव्हर्नर जनरलची संपूर्ण कारकीर्द १८५७ चा उठाव शमविण्यात व त्यानंतर नव्याने राज्यघडी बसविण्यात खर्ची पडली ?
- लॉर्ड कॅनिंग
🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ….
- इ. स. १८७९
🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे ‘हिंदू विद्यालया’ची स्थापना केली….
- अॅनी बेझंट
🔸३) …. हे विवेकानंदांचे गुरू होत.
- रामकृष्ण परमहंस
🔹४) …. यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा ‘सिव्हिल मॅरज अॅक्ट’ संमत झाला.
- ईश्वरचंद्र विद्यासागर
🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या …. या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..
- मौलवी चिरागअली
🔸१) ब्रिटिश पार्लमेंटने ‘रेग्युलेटिंग अॅक्ट’ किंवा ‘नियामक कायदा’ संमत केला ….
- इ. स. १७७३
🔹२) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली …..
- वॉरन हेस्टिंग्ज
🔸३) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते?
- वॉरन हेस्टिंग्ज
🔹४) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन केली होती ?
- मुर्शिदाबाद
🔸५) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली?
- विल्यम बेंटिंक
🔸१) बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायतराज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने इ. स. १९६० मध्ये एक समिती नियुक्त केली. तत्कालीन महसूलमंत्री …. हे या समितीचे अध्यक्ष होते.
- वसंतराव नाईक
🔹२) वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्र शासनास आपला अहवाल सादर केला ….
- १९६१
🔸३) वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा, १९६१ संमत करण्यात आला …. पासून महाराष्ट्रात पंचायतराज व त्याअंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली.
- १ मे, १९६२
🔹४) …. घटनादुरुस्ती अधिनियम, १९९२ अन्वये ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला गेला.
- ७३ वी
🔸५) राज्यात पंचायतराज पद्धतीचा अवलंब सुरू झाल्यानंतर साधारणत: आठ वर्षांनंतर म्हणजे २ एप्रिल, १९७० रोजी पंचायतराज पद्धतीच्या एकूण कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी …. यांच्या अध्यक्षतेखाली एक पुन र्विलोकन समिती नेमण्यात आली होती.
- ल. ना. बॉगिरवार

Leave a Reply