➊ फ्रेडरिक रॅट्झेल
योगदान: Environmental Determinism चे जनक
व्याख्या: “मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय.”
➋ दमॉज्यिया
योगदान: समाज व पर्यावरणातील संबंध
व्याख्या: “मानवसमूह व समाज यांचे नैसर्गिक पर्यावरणाशी असणारे संबंध अध्ययन करणारा विषय म्हणजे मानवी भूगोल होय.”
➌ डेव्हिस
योगदान: भूआकृती विकास सिद्धांत
व्याख्या: “मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण व मानवाची भौतिक प्रगती यामधील कार्यकारणभावाचे संशोधन होय.”
➍ कु. एलेन सॅम्पल
योगदान: Environmental Determinism च्या पुरस्कर्त्या
व्याख्या: “मानवी भूगोल म्हणजे अस्थिर पृथ्वी व चंचल मानव यांच्यातील बदलत्या संबंधांचा अभ्यास होय.”
➎ प्रा. जोन्स
योगदान: मानव–निसर्ग परस्परसंबंध विश्लेषण
व्याख्या: “सतत बदलणाऱ्या मानव व निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधामुळे तयार होणाऱ्या प्रदेशीय चित्राचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय.”
➏ विडा-दी-ला-ब्लाश
योगदान: Possibilism संकल्पनेचे जनक
व्याख्या: “नैसर्गिक नियम आणि मानवाच्या परस्पर संबंधातून एक नवीन विचार प्रस्तुत करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय.”
➐ जीन्स ब्रुन्स
योगदान: मानवी व्यवसायांवर भर
व्याख्या: “मानवी भूगोल म्हणजे मानवी व्यवसाय व नैसर्गिक घटक यांच्यातील संबंधांचा अभ्यास होय.”
➑ हंटिंग्टन
योगदान: Climatic Determinism चा समर्थक
व्याख्या: “भौगोलिक पर्यावरण व मानवी व्यवसाय गुण यांचे स्वरूप व परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल.”

Leave a Reply